Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : पावसाला पोषक हवामान; थंडी गायब

Maharashtra Weather Forecast : राज्यात तापमानातील वाढ कायम राहून, दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १४ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे. आज (ता. ३) राज्यात तापमानातील वाढ कायम राहून, दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

‘फेइंजल’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून उत्तर अंतर्गत तमिळनाडूमध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीची तीव्रता आणखी कमी असून, ती अरबी समुद्राकडे सरकून जाण्याची शक्यता आहे. यातच देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. सोमवारी (ता. २) मध्य प्रदेशातील ‘नवगांव’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ७.५ अंश तापमानाची नोंदले गेले. ढगाळ आकाश आणि पावसाळी हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.३ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३) राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून, किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. यातच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्याच्या धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २८.८ (१७.४), अहिल्यानगर २८.८ (२०.५), धुळे २७ (७.५), जळगाव २९.४ (१४.८), जेऊर (१५), कोल्हापूर २९.५ (२१.७), महाबळेश्वर २५.३ (१६.४), मालेगाव २५.४ (१३.२), नाशिक २८.२ (१४.६), निफाड २७.२ (१८.०), सांगली ३०.१ (२०.३), सातारा २९.५ (२१.५), सोलापूर ३०.६ (२१), सांताक्रूझ ३३.५ (२०.६),

डहाणू ३१.२ (१९.८), रत्नागिरी ३४.३ (२३.९), छत्रपती संभाजीनगर २९.४ (२०.६), धाराशिव २८ (१९), परभणी २८ (१९), परभणी कृषी विद्यापीठ २७.५ (१९.८), अकोला ३१.४ (२१.७), अमरावती ३०.४ (१९.७), भंडारा २७.४ (१९), बुलडाणा २७.२ (१९.२), ब्रह्मपुरी ३०.५ (१४.५), चंद्रपूर २९.४ (१६), गडचिरोली २८.८ (१८), गोंदिया २९.६ (१८.६), नागपूर २९.४ (१८.४), वर्धा २८ (१८), वाशीम २८.४ (१४.६), यवतमाळ २७.५.=

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT