Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Update: राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी पडत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी पडत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ दक्षिणेकडे झुकला आहे. माॅन्सूनचा ट्रफ जैसलमेर, कोटा, गुना, सतना, दलतोंगज, दिघा ते पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सरीसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण झारखंड आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे.

राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या कोकणातील सर्वल जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदूर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. पूर्व विदर्भातही आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. विदर्भातील इतर जिल्हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

शनिवारी राज्याच्या आणखी काही भागात पाऊस सुरु होण्याचा अंदाज आहे. शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेशातील जिल्हे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जर विदर्भातील गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. 

रविवारी आणि सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, विदर्भातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Pesticide: बनावट कीडनाशकांची उलाढाल ११ हजार कोटींवर

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढतोय

Maharashtra Drought Declaration: नव्याने १९ तालुके दुष्काळी

Agriculture PG Admission: पदव्युत्तर प्रवेशावरील तक्रारींवर कृषी परिषदेचा खुलासा

Sugar Hoarding Restrictions: साखरेच्या साठ्यावर केंद्राची मर्यादा

SCROLL FOR NEXT