Rain In Maharashtra Agrowon
हवामान

September Rain: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा, कोकणात पाऊस सुरु होणार: हवामान विभागाचे संकेत

IMD alert : सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्‍ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.

अनिल जाधव

maharashtra rain : राज्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. ऑगस्ट पूर्ण संपला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. पण शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान विभागाने दिला. सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांत चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने आज (ता. ३१) जाहीर केला आहे.

राज्याच्या अनेक भागात जवळपास एक महिन्यापासून पाऊस नाही. त्यामुळे सेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पिकांनी माना टाकल्यामुळे पावसाची नितांत गरज आहे. त्यातच हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस राहू शकतो, असे संकेत दिले आहेत. सप्‍टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्‍ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो,  असा अंदाज आहे.

सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांना पाऊस दिलासा देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. यासोबतच कोकण आणि गोव्यातही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतातही पावसाला सुरुवात होई शकते. कर्नाटक आणि केरळ राज्यातही पावसाचा अंदाज आहे.

ऑगस्ट महिन्यात राज्यात ५८ टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांंमध्ये ऑगस्ट महिन्यातील पाऊस सरासरीपेक्षा ७० ते ८६ टक्क्यांपेक्षा कमी झाला. पण एकाही जिल्ह्याची पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. म्हणजेच सर्वच जिल्ह्यात ऑगस्टमधील पाऊस सरासरीपेक्षा किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ऑगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिल्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. पण आता सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT