Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast: विदर्भात पावसाचा जोर कमी राहणार; राज्याच्या काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज

Rain Update: राज्यातील काही भागात मागील २ दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात मागील २ दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

आज मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही हवामान विभागाने दिला.

कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

उद्या मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील लातूर आणि कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

रविवारी आणि सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. विदर्भात दोन्ही दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यात आहे.

मंगळवारी विदर्भात पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Progress Update: मॉन्सूनच्या प्रगतीला २३ जून दरम्यान होणार पोषक स्थिती; राज्यात उष्णतेचा चटका

Ravikant Tupkar Hunger Strike: रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, गिरीश महाजनांनी घेतली आंदोलनस्थळी भेट, सरकारला चार दिवसांची मुदत

Wild Animal Crops Damage: वन्यप्राण्यांच्या धुडगुसाने केळी उत्पादक त्रस्त

Farmers Protest: सरकारच्या भूमिकेविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचे आंदोलन

Oilseed Mission: तेलबिया, कडधान्य आत्मनिर्भर अभियानातून शेतकऱ्यांना लाभ

SCROLL FOR NEXT