Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पावसाची हजेरी, तापमानात वाढ

Weather Forecast : ‘फेइंजल’ चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे राज्यातील नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : ‘फेइंजल’ चक्रीवादळाच्या अवशेषांमुळे राज्यातील नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. यातच थंडी नाहीशी झाली असून, सांताक्रूझ येथे देशातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

‘फेइंजल’ चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून कर्नाटक किनारपट्टी लगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. यातच देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. ५) हरियानातील ‘हिसार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागांत अंशातः ढगाळ हवामान असून, किमान तापमान १७ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी गायब झाली आहे. उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोकणात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे देशातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे तापमान ३५ अंशांवर पोहोचले होते. तर अनेक ठिकाणी पारा पुन्हा तिशीपार गेला आहे.

गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली. आज (ता. ६) राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.१ (१९.९), अहिल्यानगर ३२.२ (-), धुळे ३० (१७.५), जळगाव ३२ (-), जेऊर ३२ (१८.५), कोल्हापूर ३०.४ (२०.७), महाबळेश्‍वर २६.२ (१७.४), मालेगाव २९.४ (२१.२), नाशिक ३०.२ (२१.१), निफाड ३० (२१.५), सांगली ३१.२ (२०.१), सातारा ३१.२ (१९.५), सोलापूर ३३ (२२), सांताक्रूझ ३७.३ (२५.५), डहाणू ३१.९ (२३.६), रत्नागिरी ३५ (२३.७),

छत्रपती संभाजीनगर ३०.४ (२०.४), धाराशिव २९.१ (२०.४), परभणी २९.९ (२१.४), परभणी कृषी विद्यापीठ ३० (२०.२), अकोला ३२.१ (२२.६), अमरावती ३१.२ (२०.८), भंडारा ३२.४ (१८), बुलढाणा २८.२ (२०.२), ब्रह्मपूरी ३३.२ (१९.९), चंद्रपूर ३०.८ (१७), गडचिरोली ३०.६ (१८.४), गोंदिया ३१.७ (१८.६), नागपूर ३१.६ (१८.८), वर्धा ३१.१ (१९.६), वाशीम ३०.२ (२२), यवतमाळ ३०.५ (-).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सातारा, सांगली, कोल्हापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT