Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

IMD Alert: मागील आठवडाभर राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: मागील आठवडाभर राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी-अधिक राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. कोकणातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. 

उद्याही विदर्भातील आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही जोरदार पावसाची तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी आणि बुधवारी विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT