Rain Alert Agrowon
हवामान

Rainfall Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा!

Weather Update: राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली असून, कोकण-घाटमाथ्यावर जोरदार सरी तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकण, घाटमाथ्यावर पावसाने तडाखा दिला आहे. उर्वरित राज्यातही पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. आज (ता. २०) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.९ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर २०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगडमधील माथेरान येथे उच्चांकी २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

आज (ता. २०) पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

झारखंडमध्ये कमी दाब क्षेत्र सक्रिय

झारखंड आणि पश्‍चिम बंगाल परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. पंजाबपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

बिहार, उत्तर प्रदेशात मॉन्सूनची प्रगती

मोठ्या विश्रांतीनंतर नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुन्हा वेग धरला आहे. गुरुवारी (ता. १९) मॉन्सूनने बिहारचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मध्य प्रदेशच्या उर्वरित भागासह राजस्थान, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागासह, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाखपर्यंतच्या भागात दोन दिवसांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.०---२३.१

अहिल्यानगर---२९.१---२३.४

‎‎धुळे---३४.५---२०.५

जळगाव---३२.५---२५.४

जेऊर---३३.०---२१.०

‎कोल्हापूर---२९.३---२२.७

‎महाबळेश्‍वर---२०.१---१८.६

मालेगाव---३१.२---२१.६

‎‎नाशिक---२८.१---२२.५

‎निफाड---२९.३---२२.२

‎सांगली---३०.४---२२.८

‎सातारा---२७.७---२२.७

‎सोलापूर---३४.०---२६.६

‎सांताक्रूझ---३०.१---२५.६

डहाणू---३०.१---२५.०

‎रत्नागिरी---३१.४---२४.६

‎छत्रपती संभाजीनगर---३०.६---२३.६

‎धाराशिव---३०.४---२१.०

‎परभणी---३४.१---२५.१

परभणी (कृषी)---३३.८---२४.८

‎‎अकोला---३३.६---२५.३

अमरावती---३३.४---२२.३

‎भंडारा---३६.२---२६.०‎‎

बुलडाणा---३१.२---२२.८

‎ब्रह्मपुरी---३६.८---२५.४

‎चंद्रपूर---३६.६---२६.६

‎गडचिरोली---३४.४---२४.६

‎गोंदिया---३५.०---२६.२

‎नागपूर---३८.९---२७.०

‎वर्धा---३७.२---२६.८

‎वाशीम---३५.२---२३.८

‎यवतमाळ---३५.४---२५.४

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT