Rain News Agrowon
हवामान

Rain Forecast : पूर्व विदर्भात पावसाची शक्यता

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच, पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात उन्हाच्या झळा (Summer Heat) वाढल्या असतानाच, पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ४) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (rain Forecast) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, अकोला आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चंद्रपूर ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर वर्धा आणि ब्रह्मपूरी येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत असून, पारा ११ ते २४ अंशांच्या दरम्यान होता.

विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.१ (१६.४), जळगाव ३७.७ (२१.४), धुळे ३६.० (१७.०), कोल्हापूर ३५.१ (१७.९), महाबळेश्वर २९.१ (११.८), नाशिक ३३.३ (१९.०),

निफाड ३४.५(११.६), सांगली ३५.९ (१७.९), सातारा ३४.८ (१५.३), सोलापूर ३८.२(२१.१), सांताक्रूझ ३१.१ (२२.६), डहाणू ३०.९ (२२.०), रत्नागिरी ३१.७ (२१.९),

छत्रपती संभाजीनगर ३५.० (१९.४), नांदेड - (२१.४), परभणी ३७.४ (१९.०), अकोला ३८.२ (२२.२), अमरावती ३७.४(१९.४), बुलढाणा ३५.४ (२२.६), ब्रह्मपूरी ३८.१ (२२.६), चंद्रपूर ३८.२ (२३.६),

गडचिरोली ३५.८(१९.४), गोंदिया ३६.४ (१९.६), नागपूर ३७.१ (२१.३), वर्धा ३८.१(२२.९), वाशीम ३७.५ (२०.०), यवतमाळ ३७.५ (१९.५).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT