Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Rain: विदर्भात ५ दिवस पावसाची शक्यता; मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाचा जोर राहणार

Rain Forecast: हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि खानदेशात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. मात्र काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि खानदेशात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. मराठवाड्यातील काही ठिकाणीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. 

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. 

खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली. 

माॅन्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे.  मॉन्सून रविवारी ने संपूर्ण लडाख, हिमाचल प्रदेश, आणि जम्मू काश्मीरचा बहुतांश भाग, पंजाबच्या काही भागात प्रगती केली होती. मात्र माॅन्सून आज त्याच भागात होता. पुढील दोन दिवसांत पश्‍चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश जम्मू- काश्मीरचा उर्वरित भाग, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीचा आणखी काही भाग आणि राजस्थानच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Progress Update: मॉन्सूनच्या प्रगतीला २३ जून दरम्यान होणार पोषक स्थिती; राज्यात उष्णतेचा चटका

Agrowon Podcast: सोयाबीन टिकून, गहू व सोयाबीन दरात स्थिरता; लिंबू नरमले तर वांग्यात चढ-उतार

Ravikant Tupkar Hunger Strike: रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, गिरीश महाजनांनी घेतली आंदोलनस्थळी भेट, सरकारला चार दिवसांची मुदत

Wild Animal Crops Damage: वन्यप्राण्यांच्या धुडगुसाने केळी उत्पादक त्रस्त

Farmers Protest: सरकारच्या भूमिकेविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT