Rain Alert Agrowon
हवामान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर

IMD Warning: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राज्यात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राज्यात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटाकडील भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी येत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस, तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे येणार

पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र जमिनीवर आले असून, झारखंड आणि परिसरावर आहे. ही प्रणाली हळूहळू पश्चिमेकडे सरकून मध्य भारताकडे येण्याची शक्यता आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून रोहतक, कानपूर, वाराणसी, कमी दाबाचे केंद्र, दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

मंगळवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.७---२२.४

अहिल्यानगर---२९.९---२२.७

‎‎धुळे---३२.०---२१.०

जळगाव---३१.४---२१.८

जेऊर---३२.५---२१.०

‎‎कोल्हापूर---२६.३---२२.१

‎महाबळेश्‍वर---१९.६---१८.०

मालेगाव---३०.०---२१.२

‎‎नाशिक---२८.२---२२.४

‎निफाड---३०.१---२१.८

‎सांगली---२७.९---२२.६

‎सातारा---२७.१---२२.१

‎सोलापूर---३४.०---२४.०

‎सांताक्रूझ---३१.५---२६.५

डहाणू---३२.५---२५.१

‎रत्नागिरी---३०.०---२४.८

‎छत्रपती संभाजीनगर---२८.८---२२.७

‎धाराशिव---३०.१---२१.४

‎परभणी---३१.०---२४.२

परभणी (कृषी)---३२.१---२३.५

‎‎अकोला---२९.५---२५.०

अमरावती---२८.०---२२.९

‎भंडारा---२५.८---२१.०‎‎

बुलडाणा---२८.०---२३.०

‎ब्रह्मपुरी---२५.८---२२.४

‎चंद्रपूर---२८.४---२३.०

‎गडचिरोली---२७.६---२२.२

‎गोंदिया---२६.८---२३.४

‎नागपूर---३१.०---२४.३

‎वर्धा---२९.०---२५.०

‎वाशीम---२८.६---२२.२

‎यवतमाळ---२७.४---२३.२

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा अंदाज (येलो अलर्ट) :

नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT