Rain Update Agrowon
हवामान

Weather Update In Khandesh : खानदेशात अनेक भागांत पाऊस

खानदेशात तीन-चार वेळेस गारपीट पाऊस झाल्याने मका, गहू, सूर्यफूल आदी पिकांना फटका बसला. त्यात खानदेशात सुमारे ५६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पुन्हा एकदा बेमोसमी पाऊस आल्याने पीकहानी होत आहे. धुळ्यात काही भागात गारपीटदेखील झाली आहे. ऐन पीक कापणी, मळणीच्या काळात पाऊस आल्याने नुकसान होत आहे.

यापूर्वी ४ ते ७ मार्च व ९ ते १७ मार्च यादरम्यान अनेक भागात गारपीट, पाऊस झाला. तीन-चार वेळेस गारपीट पाऊस झाल्याने मका, गहू, सूर्यफूल आदी पिकांना फटका बसला. त्यात खानदेशात सुमारे ५६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

एकट्या रावेर तालुक्यात सुमारे दोन कोटी रुपयांची पिकहानी त्या वेळेस झाली. आता या महिन्यातही पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

केळी, पपई, कलिंगड, खरबूज काढणीवर आहेत. अनेक भागात काढणी सुरूदेखील आहे. तसेच काबुली हरभरा, दादर ज्वारी, मका आदी पिकांची मळणीदेखील सुरू आहे. परंतु वादळी पावसाने गुरुवारी (ता.६) अनेक भागात हजेरी लावल्याने ही कामे ठप्प झाली आहेत.

शुक्रवारीदेखील सकाळपासून ढगाळ व पावसाळी वातावरण होते. सुसाट वारा मध्येच येत होता. यामुळे केळीची पाने फाटण्याची समस्या खानदेशात तयार झाली आहे. पाने फाटल्यास पुढे झाड कमकुवत होते. घड हवा तसा येत नाही.

ज्वारी, मका मळणीच्या कामांनाही फटका बसला आहे. अनेक भागात कापणीचे काम बंद करण्यात आले. केळीची काढणीदेखील फक्त मुख्य मार्गालागतच शुक्रवारी सुरू होती. कारण अंतर्गत भागात पावसाने रस्ते खराब होऊन वाहतूक शक्य होत नाही. पपई काढणीदेखील रखडली. तसेच कलिंगड, खरबूज काढणीदेखील अनेकांनी पुढे ढकलली आहे.

या भागात पाऊस

गुरुवारी सायंकाळी धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात मध्यम पाऊस व हलकी गारपीटदेखील झाली. धुळ्यातील पूर्व व मध्य भागात गारपीट, पाऊस झाला.

नंदुरबारातही नंदुरबार, शहादा, नवापूर भागात हलका पाऊस झाला. सुरवातीला सुसाट वारा व नंतर मध्यम, हलका पाऊस तसेच काही सेकंद हरभऱ्याच्या आकाराच्या गाराही पडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT