Monsoon 2023  Agrowon
हवामान

Monsoon 2023: माॅन्सून वाट अडखळलेलीच, राज्याच्या या भागांमध्ये आज पावसाचा अंदाज

Today Monsoon Update : आज सलग तिसऱ्या दिवशी माॅन्सूनची वाट अडखळली. देशाचा बहुतांशी भाग माॅन्सूनने व्यापल्यानंतरही पाऊस सक्रीय दिसत नाही. विशेषतः राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही. केवळ काही भागातच पावसाची हजेरी लागत आहे.

Team Agrowon

Rain Update : आज सलग तिसऱ्या दिवशी माॅन्सूनची वाट अडखळली. देशाचा बहुतांशी भाग माॅन्सूनने व्यापल्यानंतरही पाऊस सक्रीय दिसत नाही. विशेषतः राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही. केवळ काही भागातच पावसाची हजेरी लागत आहे.

मागील काही दिवसांमध्ये माॅन्सूनने देशात वेगाने वाटचाल केली. विशेषतः शनिवार ते बुधवार या काळात माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला.

या काळात माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होते. त्यामुळे माॅन्सून लगेच देश व्यापेल, असा अंदाज होता. पण तसं घडलं नाही. कारण आज सलग तिसऱ्या दिवशी माॅन्सूनची प्रगती झाली नाही. आजही माॅन्सून तीन दिवस एकाच जागेवर आहे. माॅन्सूनची सिमा आजही सिमा बिकानेर, नरनौल, फिरोजपूरपर्यंत होती.

माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. केवळ राजस्थानचा काही भाग माॅन्सूनने अद्याप व्यापायचा आहे. तसेच पंजाबचा थोडा भाग आणि हरियानाच्या काही भागात माॅन्सून पोचला नाही. बुधवारी माॅन्सूनने राजस्थानच्या काही भागात प्रगती केली होती. तसेच उत्तर अरबी समुद्राचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला होता. तेव्हापासून माॅन्सून काय भागात आहे.

पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उरलेला भाग व्यापेल. म्हणजेच संपूर्ण भारत दोन दिवसांमध्ये माॅन्सूनने व्यापलेला असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

आजही राज्यातील अनेक भागात पावसाने दडी दिली. आज राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज संपूर्ण कोकण तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

यासोबत विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा अंदाज आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमवरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT