Summer Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज ; यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरणार

Weather Update : आज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. तर यंदाचा उन्हाळाही चांगलाच तापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला. आज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. तर यंदाचा उन्हाळाही चांगलाच तापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच खानदेशातील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. 

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, बीड, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उन्हाळ्यातील तापमानाविषयी हवामान विभागाने म्हटले आहे की, उन्हाळा हंगामात, मार्च ते मे या काळात देशाच्या बहुतांश भागात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात एल-निनो स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

मार्च महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. तर विदर्भात कमाल तापमान सरासरी इतके राहणार असल्याने या महिन्यातच उन्हाच्या झळा वाढणार आहेत. तर राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT