Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : विदर्भात पावसाची शक्यता

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान विदर्भात पावसाला पोषक (Rainy Weather) हवामान होत आहे. आज (ता. ३) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर छत्तीसगडपासून, तेलंगणा, आंध्र प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चंद्रपुरात उच्चांकी ३८.६ अंश तापमान

ढगाळ वातावरण, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ब्रह्मपुरी, सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत असून, पारा १२ ते २३ अंशांच्या दरम्यान होता.

रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये).

पुणे ३४.३ (१५.८), जळगाव ३६.० (२०.५), धुळे ३५.० (१५.२), कोल्हापूर ३४.६ (१८.७), महाबळेश्वर २९.२ (१३.९), नाशिक ३२.४ (१६.७),

निफाड ३३.२(१२.०), सांगली ३५.४ (१८.४), सातारा ३४.७ (१६.४), सोलापूर ३७.०(२१.२), सांताक्रूझ ३१.६ (२२.१), डहाणू ३१.६ (२०.६), रत्नागिरी ३३.७ (२१.९),

छत्रपती संभाजीनगर ३४.२ (१९.६), नांदेड ३७.८ (२०.४), परभणी ३५.८ (२१.६), अकोला ३६.९ (२१.१), अमरावती ३५.२(१९.५), बुलडाणा ३४.० (२१.६), ब्रह्मपुरी ३७.० (२०.१), चंद्रपूर ३८.६ (२१.०), गडचिरोली ३४.०(२०.२),

गोंदिया ३४.४ (१९.५), नागपूर ३५.४ (१९.०), वर्धा ३६.२(२१.६), वाशीम ३५.२ (२०.२), यवतमाळ ३५.० (१९.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT