Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Alert: राज्यात पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी येलो अलर्ट

Rain Forecast: माॅन्सूनचा प्रवास आजही थांबलेला होता. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने माॅन्सून एकाच भागात १० दिवसांपासून मुक्कामावर आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनचा प्रवास आजही थांबलेला होता. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने माॅन्सून एकाच भागात १० दिवसांपासून मुक्कामावर आहे. तर राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. 

माॅन्सूने २८ मे पर्यंत राज्याच्या अनेक भागात वाटचाल केली होती. पण त्यानंतर माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नव्हते. त्यामुळे माॅन्सून गेल्या १० दिवसांमध्ये एकाच जागेवर होता. माॅन्सून आजही मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात होता.

माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

राज्यातील काही भागात पुढील ५ दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आणि उद्या पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे.

तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाची शक्यता आहे. कोकणातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT