Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यातील आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज; काही भागात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी

Maharashtra Weather Forecast : काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाला पोषक वातावरण झाल्याने राज्यातील तापमानात चढ उतार सुरु आहेत. अनेक ठिकाणी पारा १० च्या दरम्यान दिसत असल्याने थंडीही जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News : काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाला पोषक वातावरण झाल्याने राज्यातील तापमानात चढ उतार सुरु आहेत. अनेक ठिकाणी पारा १० च्या दरम्यान दिसत असल्याने थंडीही जाणवत आहे. आज उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर दोन दिवसांत थंडी आणखी वाढेल, असाही अंदाज हवामान विभागने दिला.

राज्यातील तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. आज ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्यापासून पावसाचे वातावरण निवळेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

नैॡत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच वायव्य भारतात पश्‍चिमेकडून जोरदार वारे वाहत असल्याने राज्यांमध्ये थंडीची तीव्र झाली आहे. अनेक राज्यात दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे. आज देशातील सपाट भुभागावरील सर्वात कमी तापमानाची नोंद बिहारमधील डेहरी येथे झाली. डेहरी येथे ४.५ अंश सेल्सिअस तापमान होते. 

तर राज्यातील काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आणि अहिल्यानगर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झालेली ठिकाणे कमी होती. ढगाळ हवामानाच्या प्रभावामुळे थंडी काहीशी कमी झाली होती. मात्र राज्यातील तापमानात पुढील काही दिवस चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT