Unseasonal Rain Maharashtra agrowon
हवामान

Maharashtra Rain: राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यातील हवामान कसे राहील?

Weather Update : राज्यातील काही भागात दोन दिवस पाऊस पडत आहे. पाऊस पडलेल्या भागात हवेतील गारवा वाढला होता.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील काही भागात दोन दिवस पाऊस पडत आहे. पाऊस पडलेल्या भागात हवेतील गारवा वाढला होता. आजही बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने आजही अनेक भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला होता.

राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवड्यातील काही भागात कालपासून हलक्या पावसाने हजेरी लावली होती. पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, नेवासा, वेल्हे, नगर जिल्ह्यातील नगर येथे हलक्या पावसाने हजेरी लावली होती.

तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर येथेही हलक्या सरी पडल्या. आजही काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते.

हवामान विभागाने आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील तसेच ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्यापासून राज्यात पुन्हा कोरडे हवामान राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kisan Samman Nidhi Hike: बिहारमधील ७३ लाख शेतकऱ्यांना मोठी भेट, वर्षाला ६ हजार ऐवजी ९ हजार मिळणार

Rasta Roko Protest: हडसणी फाट्यावर बस थांब्याविना अपघाताचा धोका; ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन

Gopinath Munde Scheme: मृत शेतकऱ्यांच्या वारसांना १४ लाखांचे विमाकवच

Climate Changes Impact: सिंधुदुर्ग जिल्ह्यात किड, रोगांचा प्रादुर्भाव कायम

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’ची लांबी वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT