Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : आज, उद्या काही भागात पावसाचा अंदाज; दक्षिण भारतातही काही ठिकाणी पावसाची हजेरी

Rain update : राज्यातील काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उद्याही या भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

IMD Alert : राज्यातील काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उद्याही या भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. श्रीलंका आणि शेजारच्या किमोरिन भागात समुद्रपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही भागात पाऊस पडत आहे.

राज्यात कमाल तापमानात घट होत आहे. सकाळच्या वातावरणात गारवा वाढल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी जाणवत आहे. तर हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, अशी शक्यता व्यक्त केली. उद्याही सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभगााने दिला.

पश्चिमी चक्रावताची स्थिती सध्या हिमाचल प्रदेश आणि परिसरात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडत आहे. तर श्रीलंका आणि शेजारच्या किमोरिन भागात समुद्रपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे केरळ, कर्नाटका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात पाऊस पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT