Rain Update  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा इशारा

Latest Weather Update : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. राज्यात गारठा काहीसा कमी झाला असून, ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे.

अमोल कुटे

Weather News Pune : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. राज्यात गारठा काहीसा कमी झाला असून, ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. आज (ता. ६) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.

कोकणात कमाल तापमानातील वाढ कायम असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका अनुभवायला मिळते आहे. रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईसह कोकणात उन्हाची ताप अधिक असल्याने सांताक्रूझ, डहाणू येथे उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी येथे ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा १५ अंशाच्या पार गेला आहे. रविवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात येथे राज्यातील नीचांकी १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात आकाश ढगाळ झाले आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाची इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.९ (१८.०), जळगाव (१६.१), कोल्हापूर ३२.३ (२३.९), महाबळेश्वर २६.१ (१७.७), नाशिक ३१.२ (१५.५), निफाड ३१.६ (१४.२), सांगली ३३.० (२२.४), सातारा ३२.६ (२२.५), सोलापूर ३४.४ (२१.०), सांताक्रूझ ३६.८ (२३.०), डहाणू ३६.८ (२२.९), रत्नागिरी ३६.६ (२४.४),

छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१५.२), नांदेड ३२.८ (१९.०), परभणी ३२.६ (१८.०), अकोला ३४.८ (१६.६), अमरावती ३३.६ (१८.५), बुलडाणा ३२.५ (१७.४), ब्रह्मपुरी ३४.० (२०.०), चंद्रपूर ३२.०(१७.६), गडचिरोली ३३.० (१६.८), गोंदिया ३२.५ (१६.५), नागपूर ३२.९ (१६.२), वर्धा ३३.२(१७.६), वाशीम ३२.२(१७.२) यवतमाळ ३५.० (१४.५).

वादळी पावसाचा इशारा :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली.

विजांसह पावसाचा अंदाज :

रत्नागिरी, सातारा.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत

दक्षिण तमिळनाडू आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या ही प्रणाली वायव्येकडे सरकत जाणार असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात बुधवारपर्यंत (ता. ८) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून वरील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT