Monsoon Forecast Map Agrowon
हवामान

Monsoon Rain Alert: विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; कोकणात मुसळधारेची शक्यता

Monsoon Forecast : राज्यात माॅन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, विदर्भ आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात माॅन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोकण, विदर्भ आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने कोकणात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज दिला. आज रायगड जिल्हा, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्य़ावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात आज आणि ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. 


विदर्भातील इतर जिल्हे, खानदेशमधील ३ जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचाी शक्यता आहे. 

उद्यापासून गुरुवारपर्यंत सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्हे तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT