Rain  Agrowon
हवामान

Paus Andaj : राज्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज; राज्यातील ११ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा येलो अलर्ट

Weather Forecast : हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात थंडी कमी झालेली आहे. अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज दिला. तसेच आणखी काही दिवस थंडी कमीच राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

तर रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच आज काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने उद्याही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजांसह हलक्या पावासाच येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT