Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain: मराठवाडा, विदर्भात ३ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता कायम

Weather Forecast : मराठवाडा, विदर्भात ३ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता कायम

Anil Jadhao 

Pune News : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही भागात पाच ते सहा दिवस पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. 

हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तसेच कोकणातील रागयगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी वीजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तसेच मराठवड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज आहे. 

उद्या म्हणजेच मंगळवारी मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड तेसच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे,सांगली, सोलापूर याशिवाय कोकणातील रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला. तर गुरुवारी सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. 

शुक्रवारी सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज आहे. तर शनिवारी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT