Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : काही भागात तीन दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील तापमानात चढ उतार व्हायला सुरुवात

Rain Forecast : आजपासून तीन दिवस राज्यच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. किमान आणि कमाल तापमानात बदल होत आहे. तर आजपासून तीन दिवस राज्यच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यात सध्या सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे राज्याला थंडीची चाहूल लागली. तसेच हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर ठाणे, नाशिक, नगर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

उद्या कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तसेच ठाणे, नगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

शुक्रवारी कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच रायगड, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा आवक कायम, कांद्याच्या भावात वाढ, मेथी बाजारात चढ-उतार, शेवगा दरात बदल तर पपईच्या दरात वाढ

Maharashtra Protest Cases: राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ, शासन निर्णय जारी

Agricultural Training: कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा : डॉ. इंद्र मणी

Gajar Gavat Control: गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे?

Workers Protest: असंघटित कष्टकऱ्यांचे पैठण गेटवर धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT