Hailstorm  Agrowon
हवामान

Hailstorm Orange Alert : आज आणि उद्या गारपीट व पावसाचा अंदाज; ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली. रविवारनंतर पावसाळी वातावरण निवळेल. त्यानंतर थंडी पुन्हा वाढू लागेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्‍चिमी चक्रावात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत, पावसाला पोषक हवामान झाले आहे.

हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस आणि गारपीटीचा इशारा दिला. आज अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी भागात ढगाळ वातावरण राहून विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरीही पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हल्या पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर वाशिम, वर्धा, नागपूर, हिंगोली, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदीया, आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने दिली.

रविवारी नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यानंतर राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल आणि राज्यात पुन्हा थंडी वाढण्याला सुरुवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT