Rain Update Agrowon
हवामान

Stormy Rain Update : सोलापुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा पुन्हा तडाखा

सोलापूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता.२८) पहाटे आणि पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने काही भागात हजेरी लावली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. 28 ) पहाटे आणि पुन्हा सकाळी नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने काही भागात हजेरी लावली. या पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब, उन्हाळी सोयाबीन, कांदा या पिकाला फटका बसला.

प्रामुख्याने पंढरपूर, बार्शी, करमाळा आणि दक्षिण सोलापुरात हा पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सातत्याने हजेरी लावून नुकसान करत आहे. गेल्या दोन दिवसापासून कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र जिल्ह्यात आहे.

गुरुवारी रात्रीपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मध्यरात्री आणि आज सकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाने पुन्हा सुरवात केली. पंढरपूर तालुक्यातील सरकोली, तुंगत, देगाव, ईश्वरवठार या भागात हा पाऊस झाला. इथे आंबा, ऊस, केळी या पिकांना फटका बसला.

बार्शी तालुक्यात पानगाव, काळेवाडी, पांगरी, नारी भागात पावसाने उन्हाळी सोयाबीन, कांदा, मका पिकाचे नुकसान केले. करमाळ्यातही केत्तूर भागात पावसाने केळीचे नुकसान झाले. तर दक्षिण सोलापुरात बंकलगी व परिसरात केळी आणि पपईला फटका बसला. वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाल्याने अनेक भागात पिके आडवी पडली.

सायंकाळी पावसाने पुन्हा झोडपले

शुक्रवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा साडेचारच्या सुमारास दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या तालुक्याला पावसाने झोडपले. दक्षिण सोलापुरातील अनेक गावात भाजीपाल्याचे फाउंडेशन कोसळले.

मोहोळ आणि उत्तर सोलापुरातही कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटासह वादळ वारे आणि पावसाच्या जोरामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सध्या कांदा, भाजीपाला काढणी सुरु आहे, काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिशव्या शेतातच झाकून ठेवल्या आहेत. पण या वादळवारे आणि पावसापुढे त्याला मात्र चांगलाच फटका बसला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT