Weather Update Agrowon
हवामान

Weather News : मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. तर विविध भागात वादळी पावसासह गारपीट देखील होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. तर विविध भागात वादळी पावसासह गारपीट (Hailstorm) देखील होत आहे. आज (ता. १७) मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा आहे.

तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

कमाल तापमानात चढ-उतार होत असले तरी उन्हाच्या झळा चांगल्याच तापदायक ठरत आहेत. राज्यात उकाडा देखील कायम आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर यवतमाळ, धुळे येथे तापमान ४० अंशांवर होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३४ ते ४० अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर उत्तर राजस्थान आणि लगतच्या पंजाब राज्यात, तसेच वायव्य मध्य प्रदेशात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती निर्माण झाली आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत. आज (ता. १७) मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.६ (१८.२), जळगाव ४१.० (२१.७), धुळे ४०.० (१६.०), कोल्हापूर ३४.६ (२३.६), महाबळेश्वर ३१.६ (१४.५), नाशिक ३८.२ (१७.६),

निफाड ३९.०(१५.५), सांगली ३५.९ (२२.७), सातारा ३६.२ (१९.४), सोलापूर ३८.५ (२२.३), सांताक्रूझ ३४.६ (२५.०), डहाणू ३३.९ (२१.८), रत्नागिरी ३४.१ (२४.६),

छत्रपती संभाजीनगर ३७.३ (२०.२), नांदेड - (२३.४), परभणी ३६.९ (२३.५), अकोला ३९.० (२२.८), अमरावती ३६.२(२२.३), बुलढाणा ३८.२ (१८.६), ब्रह्मपूरी ३३.४ (२३.०),

चंद्रपूर ३९.४ (२३.६), गडचिरोली ३७.२(२१.४), गोंदिया ३४.५ (२१.५), नागपूर ३१.२ (१९.६), वर्धा ३५.१(२२.५), वाशीम ३९.४ (२६.६), यवतमाळ ४०.५ (२१.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : धाराशिव, लातूर, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT