Cold Weather Update Agrowon
हवामान

Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्याच्या कमाल आणि कमान तापमानाच चढ-उतार सुरू आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा वाढत आहे.

अमोल कुटे

Pune Weather Update : राज्याच्या कमाल आणि कमान तापमानाच चढ-उतार सुरू आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा वाढत आहे. गुरूवारी (ता. २) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या दक्षिणेकडे मात्र अद्याप जोरदार थंडीची प्रतिक्षा आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ आणि रत्नागिरी येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट होत असून, पारा सातत्याने ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम असला तर उर्वरित राज्यात मात्र थंडीची प्रतिक्षा आहे. गुरूवारी (ता. २) जळगावपाठोपाठ धुळे, निफाड, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे तापमानाचा पारा १५ अंशाच्या खाली कोसळला होता. तर उर्वरित राज्यात किमान तापमान १५ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. किमान तापमान घट होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.८ (१४.७), धुळे ३२.५ (१३.४), जळगाव ३३.२ (१०.९), कोल्हापूर ३२.६ (२०.१), महाबळेश्वर २६.५ (१६.४), नाशिक ३१.४ (१५.५), निफाड ३१.८ (१४.०), सांगली ३२.८ (१९.३), सातारा ३२.० (१६.२), सोलापूर ३४.६ (१८.८), सांताक्रूझ ३६.० (२२.०), डहाणू ३५.१ (२१.७), रत्नागिरी ३६.० (२१.६),

छत्रपती संभाजीनगर ३१.८ (१४.४), नांदेड ३१.४ (१९.०), परभणी ३१.९ (१७.४), अकोला ३३.५ (१८.०), अमरावती ३२.४ (१९.०), बुलढाणा ३१.२ (१७.८), ब्रह्मपूरी ३३.९ (२०.०), चंद्रपूर ३१.०(१७.५), गडचिरोली ३१.६ (१७.२), गोंदिया ३१.० (१७.५), नागपूर ३१.५ (१९.०), वर्धा ३१.५(१९.०), वाशीम ३२.०(१६.२) यवतमाळ ३२.५ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT