Cold Weather Agrowon
हवामान

Weather Forecast : राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

Winter Update : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटे तापमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे.

अमोल कुटे

Weather Update Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटे तापमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उन्हाचा चटका वाढला होतो. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार पोहोचला होता.

त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा कमी होऊ लागला आहे. कोकण वगळता अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ३३ अंशांच्या खाली आले आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

किमान तापमानाचा पारा कमी झाल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह निफाड येथे तापमानाचा पारा १३ अंशांच्या खाली घसरला आहे. पहाटे गारठा जाणवू लागला असून, काही भागात धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किमान तापमानात घट होणार असल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.६ (१४.४), जळगाव ३४.८ (१०.९), कोल्हापूर ३२.१ (१९.१), महाबळेश्‍वर २५.८ (१५.६), नाशिक ३२.३ (१५), निफाड ३२.८ (१२.८), सांगली ३३.४ (१८.१), सातारा ३२.५ (१५.७), सोलापूर ३५.८ (१६.५), सांताक्रूझ ३६.१ (२१.४), डहाणू ३५.४ (२१.५), रत्नागिरी ३६.४ (२१.८),

छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१४.४), नांदेड ३२.४ (१८.२), परभणी ३३.४ (१६.५), अकोला ३५.१ (१७), अमरावती ३३.८ (१६), बुलडाणा ३२.५ (१७.८), ब्रह्मपुरी ३४.४ (१७.५), चंद्रपूर ३१.६(१६.४), गडचिरोली ३२.२ (१६.६), गोंदिया ३१.८ (१४.४), नागपूर ३३.० (१६.६), वर्धा ३३.५(१७.२), वाशीम ३४.६ (१५) यवतमाळ ३४.५ (१६.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT