Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यातील हवामान बदलले! अंशतः ढगाळ हवामानाचा इशारा

Cloudy Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला आहे. राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट दूर होण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला आहे. राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट दूर होण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे. यातच किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. आज (ता. २९) किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. शनिवारी (ता. २८) राजस्थानच्या ‘जैसलमेर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडी गायब झाली असून, जेऊर येथे नीचांकी १५.५ अंश तापमान नोंदले गेले.

उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला असून, अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. यातच पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. राज्यात अवकाळी पावसाचे सावट दूर होणार असले, तरी आज (ता. २९) राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.१ (१७.३), अहिल्यानगर २७.९ (१७.५), धुळे ३२ (१६.४), जळगाव ३०.२ (१९.८), जेऊर २९.५ (१५.५), कोल्हापूर २८.७ (२०), महाबळेश्‍वर २४.१ (१६), मालेगाव - (२०), नाशिक ३०.९ (१८.५), निफाड २८.८ (१७.८), सांगली - (१९.१), सातारा - (१९.८), सोलापूर २८.८ (२१.१), सांताक्रूझ ३०.८ (२१),

डहाणू २७.८ (१९.५), रत्नागिरी ३३ (२२.६), छत्रपती संभाजीनगर २८.६ (१८.४), धाराशिव २७.८ (१७.३), परभणी - (१७.९), परभणी कृषी विद्यापीठ २९.७ (१६.१), अकोला २६.७ (१९.१), अमरावती २८.४ (१९.२), भंडारा ३०.६ (२२), बुलडाणा २९ (१८.८), ब्रह्मपुरी ३३.९ (२०.२), चंद्रपूर ३० (-), गडचिरोली २९(१८.६), गोंदिया ३०.६ (२०.६), नागपूर २९.६ (१९.१), वर्धा ३०.२ (१९), वाशीम ३०.२ (१८.६), यवतमाळ २९.५ (-).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT