Rain News  Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात 'ऑरेंज अलर्ट'

Rain Prediction : राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पावसाच्या हजेरी, ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात घसरण होत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २७ ते ३६ अंशाच्या दरम्यान होते. राज्यात सर्वदूर पावसाने हलक्या ते मध्यम हजेरी लावली असून, कोकणात पावसाचा जोर कायम आहे.

अंतर्गत ओडिशा, दक्षिण झारखंड, उत्तर छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून वायव्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, दक्षिण गुजरात पासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

आज (ता. २७) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा इशारा, असून, उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती

यंदा केरळसह देशात यंदा काहीसा उशीराने दाखल झालेल्या मॉन्सूनने वेगाने घोडदौड देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. सोमवारी (ता. २६) वायव्य भारतात मॉन्सूनने प्रगती केली असून, जम्मू काश्मिर, लडाख व्यापून, उत्तर अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाबच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (आरेंज अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT