Hailstorm Forcast Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा ‘ऑरेंज’ अलर्ट

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी (ता. १४) विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Weather Update पुणे : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी (ता. १४) विजांसह हलक्या पावसाने (Rainfall) हजेरी लावली.

पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. १६) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे.

मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह (Hailstorm Forecast) वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट (Hailstorm Orange Alert) हवामान विभागाने दिला आहे.

ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट होत आहे. कोकणातील उष्ण लाट निवळली आहे. मात्र राज्याच्या विविध भागात उकाडाही वाढला आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते.

उत्तर तमिळनाडू ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

पश्चिम बंगाल ते ओडिशा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे.

यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. १६) राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट होण्याचा, विदर्भात वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.९ (१९.४), जळगाव ३४.८ (१५.८), धुळे ३६ (१६), कोल्हापूर ३५.५ (२१.१), महाबळेश्वर २८.५ (१७.८), नाशिक ३३ (१८.५), निफाड ३४.८(१५),

सांगली ३५.६ (१९.३), सातारा ३५.५ (१८.९), सोलापूर ३७.४(२१.९), सांताक्रूझ ३६.८ (२४.४), डहाणू ३६.२ (२२.६), रत्नागिरी ३६.३ (२२.५), छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१६), नांदेड ३६.८ (२१.६), परभणी ३६.१(२०.२), अकोला ३४.४ (१८.५), अमरावती ३२.८(१८.५),

बुलडाणा ३०.४(२०.५), ब्रह्मपुरी ३८.९ (२२.४), चंद्रपूर ३८.९ (२२.४), गडचिरोली ३५.४(१६.६), गोंदिया ३५.२ (१७.६), नागपूर ३६.२ (१८.२), वर्धा ३६.७(१९.४), वाशीम ३५.६ (२०.२), यवतमाळ ३६.५ (१९.७).

-

गारपिटीसह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे.

वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, वर्धा, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT