Maharashtra Weather Agrowon
हवामान

Hailstorm In Maharashtra : शुक्रवारी चार जिल्ह्यांना गारपीटीचा ऑरेंज अलर्ट; मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान

Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात पुढील दोन दिवस बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे. आज राज्यात ढगाळ वातावरणसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील.

तर उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे.

राज्यात आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पावसाची शक्यता आहे. तर उद्या धूळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजासह गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच नंदुरबार, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर अकोला, अमरावती बुलढाणा, वर्धा जिल्ह्यात वादळी वारे विजांच्या लखलखटासह तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकत हळूहळू निवळत आहे. पश्‍चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे, तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झाले आहे.

शेतकऱ्यांनी पक्व फळे आणि भाजीपाला पिकांची लवकरात लवकर काढणी करावी. तसेच काढणी केलेल्या माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तर गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नव्याने लागवड केलेल्या किंवा कोवळ्या फळझाडांना नुकसान होऊ नये, यासाठी आधार द्यावा. तसेच शेतकऱ्यांना शक्य असल्यास भाजीपाला आणि फळबागांमध्ये हेलनेटचा वापर करावा. तसेच गायी, म्हशी, शेळ्या, मेंढया व इतर जनावरे मोकळ्या जागेत चारायला सोडू नयेत, असा कृषी हवामान केंद्रानं सल्ला दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT