Heavy Rain Agrowon
हवामान

Maharashtra Heavy Rain: पश्‍चिम महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’ राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाच्या जोरदार शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. १८) राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपीट होण्याची, तसेच सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्यांची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला आहे. कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, तसेच विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीने तापमानात घसरण होत असली तरी उकाडा कायम आहे.

शनिवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली. ‎चंद्रपूर आणि नागपूर येथे ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, ‎गोंदिया, ‎परभणी, अकोला, अमरावती, ‎वर्धा, गडचिरोली आणि ‎यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भवगळता उर्वरित राज्यात कमाल तापमान कमी झाले आहे.

आज (ता. १८) संपूर्ण विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पुण्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शनिवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३३.८---२३.४

अहिल्यानगर---३३.८---२१.६

‎‎धुळे---३६.०---२३.५

‎जळगाव---३६.४---२५.५

‎जेऊर---३५.०---२०.५

‎कोल्हापूर---३३.५---२३.८

महाबळेश्‍वर---२४.१---१८.५

‎मालेगाव---३५.२---२४.०

‎नाशिक---३२.२---२३.६

‎निफाड---३३.३---२१.१

‎सांगली---३४.६---निरंक

‎सातारा---३१.७---२४.०

‎सोलापूर---३५.२---२४.५

सांताक्रूझ---३४.४---२७.९

डहाणू---३५.७---२७.३

‎रत्नागिरी---३३.६---२६.२

‎छत्रपती संभाजीनगर---३४.०---२४.२

‎धाराशिव---३५.१---२०.६

‎परभणी---३९.३---२५.४

‎परभणी (कृषी)---३८.०---२३.७

अकोला---३९.६---२७.७

अमरावती---३९.४---२५.३

‎‎‎बुलडाणा---३५.२---२४.२

‎ब्रह्मपुरी---४१.७---२४.६

‎चंद्रपूर---४१.६---२४.८

‎गडचिरोली---३९.०---२४.०

गोंदिया---३९.९---२३.५

‎नागपूर---४१.०---२७.१

‎वर्धा---३९.५---२५.२

‎वाशीम---३७.४---निरंक

‎यवतमाळ---३९.०---२४.०

वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

‎३८ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎ब्रह्मपुरी ४१.७, ‎चंद्रपूर ४१.६, ‎नागपूर ४१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT