Rain Alert Agrwoon
हवामान

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथा, विदर्भात वाढणार जोर

Weather Forecast : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी, कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरीमागून सरी कोसळत आहेत. आज (ता. ३०) कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी, कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरीमागून सरी कोसळत आहेत. आज (ता. ३०) कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसह, पुणे, सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर कोकण, विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी व विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात अनेक भागात पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानातील वाढ कायम असून, उकाडा तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३३.५ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सूरू आहे. राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

आज (ता. ३०) रत्नागिरीसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर घाटमाथा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, तसेच उर्वरित विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.\

उपसागरात कमी दाबाची शक्यता

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, सोनीपत, आयोध्या, गया, पुरुलिया, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे केंद्र ते आग्येय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांपासून कमी दाब क्षेत्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

रविवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.५---२०.९

अहिल्यानगर---३१.०---२२.४

‎‎धुळे---३०.०---२०.६

जळगाव---३२.०---२३.०

जेऊर---३५.०---२०.५

‎‎कोल्हापूर---२८.७---२१.९

‎महाबळेश्वर---१९.७---१७.५

मालेगाव---२९.६---२१.४

‎‎नाशिक---२९.४---२१.६

‎निफाड---२९.४---२१.४

‎सांगली---३०.३---२२.२

‎सातारा---२८.६---२२.०

‎सोलापूर---३४.०---२४.०

‎सांताक्रूझ---३१.४---२५.०

डहाणू---३१.३---२३.९

‎रत्नागिरी---३१.०---२५.१

‎छत्रपती संभाजीनगर---३०.०---२२.५

‎धाराशिव---३१.६---२१.४

‎परभणी---३१.६---२४.५

परभणी (कृषी)---३१.६---२४.५

‎‎अकोला---३२.८---२४.१

अमरावती---३२.२---२१.७

‎भंडारा---३१.०---२३.०‎‎

बुलढाणा---२९.५---२२.०

‎ब्रह्मपुरी---३२.६---२३.९

‎चंद्रपूर---३३.८---२४.२

‎गडचिरोली---३०.६---२३.६

‎गोंदिया---२८.९---२१.६

‎नागपूर---३३.६---२२.६

‎वर्धा---३४.०---२३.५

‎वाशीम---२९.२---२१.६

‎यवतमाळ---३१.०---२३.०

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर घाटमाथा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा अंदाज (येलो अलर्ट) :

अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT