Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपीट, वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

Unseasonal Rain : उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान झाले आहे.

Team Agrowon

Pune News : उन्हाचा चटका वाढला असतानाच, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. २६) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या प्रणालीपासून, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

वादळी पावसाला पोषक वातावरण झाल्याने आज (ता. २६) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.४ (१७.६), जळगाव - (२०.५), कोल्हापूर ३६.६ (२१.९), महाबळेश्वर ३१.२ (१७.९), नाशिक ३७.३(२०.२), निफाड ३८.४(१६.६), सांगली ३८.२ (२२.३), सातारा ३६.८ (२१.६), सोलापूर ३९.५ (२३.५), सांताक्रूझ ३२.७ (२६.०), डहाणू ३३.१ (२४.४), रत्नागिरी ३२.६ (२३.७), छत्रपती संभाजीनगर ३७.७ (२०.२), नांदेड ३७.४ (२६.२), परभणी ३९.० (२६.६), अकोला ३९.८ (२२.२), अमरावती ३९.६(२३.५), बुलढाणा ३६.४ (२१.४), ब्रह्मपूरी ३७.४ (२३.५), चंद्रपूर ३६.० (२२.४), गडचिरोली ३४.४(२२.४), गोंदिया ३६.४ (२३.६), नागपूर ३५.९ (२३.४), वर्धा ३८.५(२४.२), यवतमाळ ३७.५ (२४.५).

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

मंगळवारी (ता. २५) दुपारनंतर मराठवाड्यात विविध ठिकाणी वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे.

नांदेड :

- नायगाव, लोहा तालुक्यात पावसाचे आगमन

- पोखरणी कृषी विज्ञान केंद्र परिसरात गारपीट

हिंगोली :

- डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथे गारपीट, केळी बागांचे मोठे नुकसान.

- वारंगा फाटा परिसरात गारपीट, जोरदार पाऊस.

जालना :

- कुंभार पिंपळगाव येथे विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात

- घनसावंगी विजेचा कडकडाट वादळ वारे, हलक्या पावसाच्या सरी

- तिर्थपुरी येथे विजेचा कडकडाट वादळ वाऱ्यासह पाऊस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT