October Heat  Agrowon
हवामान

October Heat : ‘ऑक्टोबर हीट’ अधिक जाणवणार

Latest Weather Update : ऑक्टोबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू असल्याने काही दिवसांतच मॉन्सून राज्यासह देशातून परतण्याची चिन्हे आहेत. ऑक्टोबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे. ‘ऑक्टोबर हीट’ अधिक जाणवणार असून पहाटेचा गारवा कमी राहण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून, कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ऑक्टोबर महिन्यात मॉन्सून परतून गेल्याने राज्यात निरभ्र आकाश होऊन, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येणार आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढण्याचे संकेत आहेत.

हवामान विभागातील निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, २१ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. सूर्याला विषुववृत्त ओलांडून जाण्यासाठी ४५ दिवसांचा संक्रमण कालावधी लागतो. या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत सूर्याची उष्णता अधिक मिळते. मोसमी वारे (मॉन्सून) परतत असल्याने उत्तरेकडील कमी दाब दक्षिण भारताकडे सरकतात.

पाऊस निघून गेल्याने आकाश निरभ्र राहते. त्यामुळे दिवस भारतातील अधिक काळ स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येतो. त्यामुळे अधिकाधिक उष्णता जमिनीवर येते. परिणामी जमीन आणि लगतची हवा देखील तापते. यातच आर्द्रता वाढल्याने अधिक काळ उष्णता कायम राहून तापमानात वाढ होते. यामुळे ऑक्टोबर महिन्यात उष्णता अधिक असते.

दक्षिणेकडे तापमान अधिक असल्याने या भागात हवेचे दाब कमी होतात. उलट उत्तरेकडे मात्र हवेचे दाब वाढतात. परिणामी वाऱ्याची दिशा घड्याळाच्या काट्या प्रमाणे होऊन, मध्य बिंदूपासून बाहेरच्या बाजूला हवा फेकली जाते.

याच दरम्यान उत्तरेकडे पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे पाऊस आणि हिमवृष्टी होत असते. ‘ऑक्टोबर हीट’ मुळे कमी दाबाच्या प्रणाली दक्षिणेकडे तयार होत असल्याने उत्तर - ईशान्येकडून वारे दक्षिण-नैॡत्येकडे वाहतात. उत्तरेकडील थंडी हळूहळू दक्षिणेकडे पसरत जाते, असे श्री. खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT