Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : दक्षिणेत ईशान्य माॅन्सून सक्रिय; राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज

Anil Jadhao 

Rain update News : ईशान्य माॅन्सून देशात सक्रिय झाला आहे. राज्यात आज काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावासाचा अंदाज दिला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान विभागाने आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

दक्षिण भारतात ईशान्य माॅन्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि आग्नेय भागात ठळक कमी दाबाचे क्षत्राची निर्मिती झाली तसेच कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण भारतात ईशान्य वाऱ्याचे प्रवाह वाढत आहे. हे ईशान्य वारे बंगालच्या उपसागराच्या मध्यात समुद्रपाटीपासून ५.८ किलोमीटरपर्यंत उंचीवर आहे. यामुळे दक्षिण भारतात ईशान्य माॅन्सून सक्रिया झाला आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT