Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather Report : उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला

Maharashtra Weather Forecast : आज (ता. १६) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

IMD Report : किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर उर्वरित राज्यात मात्र अद्यापही गुलाबी थंडीची प्रतिक्षा आहे. आज (ता. १६) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकणात कमाल तापमान हळूहळू कमी होऊ लागले असून, बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रात पारा घसरू लागल्याने निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाडसह, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१६.३), जळगाव ३४.७ (१५.२), कोल्हापूर ३०.६ (२०.१), महाबळेश्वर २६.६ (१६.०), नाशिक ३२.० (१४.८), निफाड ३२.४ (१३.३), सांगली ३०.४ (१८.८), सातारा ३१.६ (१७.१), सोलापूर ३१.९ (१८.६), सांताक्रूझ ३६.४ (२२.६), डहाणू ३३.३ (२१.४), रत्नागिरी ३४.४ (२२.६), छत्रपती संभाजीनगर ३२.२ (१३.४), नांदेड ३२.४ (१७.६), परभणी ३२.० (१६.०), अकोला ३४.१ (१६.६), अमरावती ३१.८ (१७.२), बुलढाणा ३२.० (१६.४), ब्रह्मपूरी ३३.० (१८.०), चंद्रपूर ३१.२(१६.६), गडचिरोली ३१.६ (१६.२), गोंदिया ३१.२ (१६.४), नागपूर ३१.४(१६.३), वर्धा ३१.८(१६.९), वाशीम ३३.८(१६.८) यवतमाळ ३४.५ (१४.५).

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने बुधवारी (ता. १५) ही प्रणाली आणखी तीव्र झाली. या प्रणालीचे केंद्र आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनमपासून ५१० किलोमीटर, तर ओडिशाच्या परादीपपासून ६५० किलोमीटर आग्नेयेकडे होते.

ही प्रणाली आज (ता. १६) आणखी तीव्र होऊन उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे. उत्तर श्रीलंकेजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून वरील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

Kolhapur Millet Festival: कोल्हापुरात मिलेट महोत्सवात ‘उत्पादक ते ग्राहक’ थेट विक्री

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

SCROLL FOR NEXT