हवामान

Maharashtra Hawaman Update : उत्तर भारतात थंडीची लाट कायम; राज्यातील थंडीत चढ उतार सुरु; काही ठिकाणी तापमानात वाढ

Maharashtra Temperature Fluctuation : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडका कायम असून थंडीची लाट आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. त्यामुळे राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडका कायम असून थंडीची लाट आहे. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील तापमानात चढ उतार दिसतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही प्रणाली १२ तासात उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. आज पंजाबमधील अदामपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक तापमान तमिळनाडूतील मदूराई आणि इरोड येथे ३५ अंश सेल्सिअस होते.

राज्यातील काही भागात आज तापमानात च उतार दिसून आले. तर अनेक ठिकाणी आजही थंडीची कायम होती. अनेक भागात १० अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली होती. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

जेऊर येथे ७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर अहिल्यानगर येथे आज ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. याशिवाय नांदेड येथे ७.६ अंश सेल्सिअस, नाशिक तेथे ९ अंश सेल्सिअस, मोहोळ येथे ९.१ अंश सेल्सिअस, बीड येथे ९.५ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर येथे ९.७ अंश सेल्सिअस, परभणी येथे ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील किमान आणि कमाल तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT