Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पुढील ५ दिवस पावसाचे; राज्यभरात पावसाचा पोषक हवामान; अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने आजपासून पुढील पाचही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटही होईल.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात कालपासून वादळी वारे आणि ढगाळ वातावरण दिसत होत आहे. तर काही ठिकाणी वादळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाने आजपासून पुढील पाचही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी गारपीटही होईल, असाही इशारा हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट होईल असा अंदाज दिला. तर गडचिरोली जिल्ह्यात आज आणि उद्या, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज काही भागासाठी देण्यात आला. 

संपूर्ण विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस, म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी ठिकठिकाणी वादळी वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील पाच दिवस विजा आणि मेघर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. खानेदेशातही वादळी पावसाची हजेरी कायम राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणात रविवारी आणि शनिवारी पाऊस हजेली लावेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT