Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : ढगाळ हवामानामुळे थंडीत चढ उतार; राज्यातील अनेक भागात सकाळी धुक्याची चादर

Winter Weather Update : राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान दिसत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी झालेला दिसतो.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान दिसत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका कमी झालेला दिसतो. धुके आणि ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

तसेच पुढील काही दिवस किमान तापमानातील चढ-उतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

आज मध्य प्रदेशातील राजगडमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे. 

राज्यातील किमान तापमानात काही प्रमाणात चढ उतार दिसत आहेत. त्यामुळे थंडीही कमी झालेली आहे. राज्यातील अनेक भागात सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने थंडी कमी आहे.

राज्यातील ढगाळ हवामानाची स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीत काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT