Summer Weather Agrowon
हवामान

Maharashtra Summer Prediction: एप्रिलमध्ये महाराष्ट्रात जास्त ऊन आणि पावसाचा अंदाज; तीन महीने उन्हाळा तापदायक ठरणार

Maharashtra Summer Weather: यंदाच्या उन्हाळा हंगामात महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात जास्त ऊन आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, ज्यामुळे राज्यातील विविध भागांत उष्ण लाटांची स्थिती निर्माण होऊ शकते.

Anil Jadhao 

Pune News: यंदाच्या उन्हाळा हंगामात म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऊन यंदा तापदायक ठरणार आहे. हे तीन महीने महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत उन्हाचा चटका तापदायक ठरणार तर आहेच शिवाय राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला. तसेच एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा उन्हाळा हंगामातील म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यातील तापमानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला. उन्हाळ्यात शाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे. दक्षिण भारताचा पश्‍चिमेकडील भाग, पूर्व-मध्य आणि पूर्व भारतात कमाल तापमान सरासरीजवळ राहणार आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमानही सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे.

एप्रिल महिन्यात राज्यासह देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. यात सलग २ ते ५ दिवस कालावधीच्या उष्ण लाटा अनुभावायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटा दिसून येतील. गुजरात, तसेच पूर्व किनारपट्टी आणि पूर्व भारतातही उष्ण लाटांचा इशारा आहे.

तर देशात सरासरी इतक्या म्हणजेच ८८ ते ११२ टक्के पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर विदर्भसह उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT