Heat Wave Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सूनचा श्रीलंकेत मुक्काम; राज्यात दोन दिवस पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णता आणि पाऊस राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने काल श्रीलंकेपर्यंत मजल मारली होती. मात्र आज माॅन्सूनने आहे त्याच भागात मुक्काम केला. पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून पुढचा प्रवास करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर राज्यात पुढील दोन दिवस उष्णता आणि पाऊस राहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला.

माॅन्सूनने काल दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली होती. पण आज माॅन्सून याच भागात होता.

माॅन्सूनमध्ये आज प्रगती झाली नाही. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. पुढील २ दिवसांमध्ये माॅन्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेचा आणखी काही भाग, अंदामान आणि निकोबारचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र, श्रीलंकेचा आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

दुसरीकडे देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे. काल देशातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सिअस तापमान राजस्थानमधील बारमेरमध्ये नोंदले गेले. देशातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. हवामान विभागाने पुढील ३ दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

दुसरीकडे देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे. काल देशातील सर्वाधिक ४८ अंश सेल्सिअस तापमान राजस्थानमधील बारमेरमध्ये नोंदले गेले. देशातील अनेक भागात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. हवामान विभागाने पुढील ३ दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर आणि नाशिक, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. 

उद्या पुणे, नगर, नाशिक,जळगाव, धुळ आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT