Monsoon Update  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनची चाल मंदावली

Monsoon Rain : मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. १२) विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे. मॉन्सूनची चाल मंदावली असून, वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे.

यंदा अरबी समुद्रावरून मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने झाला. केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर मोसमी वारे चार दिवस अगोदर ६ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झाले. ८ जून रोजी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागात देखील मॉन्सून पोचला होता. मॉन्सूनने ९ जून रोजी मुंबईसह, ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली.

सोमवारी (ता. १०) वाटचाल सुरूच ठेवत डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मजल मारली. तर मंगळवारी (ता. ११ संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, विदर्भाच्या काही भागात मॉन्सून पोचला.

तर बुधवारी (ता. १२) पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात मॉन्सून पोचला आहे. संपूर्ण तेलंगणा व्यापणाऱ्या मॉन्सूनची उर्वरित देशातील वाटचाल शुक्रवारी (ता. १४) कायम होती.

अरबी समुद्रावरून वाटचाल थबकली

बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह अद्यापही क्षीण आहेत. यातच अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थबकली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राचा आणखी काही भाग, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीकडील भाग, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT