Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: माॅन्सून दणका देणार; राज्यात ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Rain Alert: राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात माॅन्सून दाखल झाल्याने काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. आज सहा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात उद्याही अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. बुधवारनंतर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात आज, उद्या आणि बुधवारी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तुलनेत पावसाचा जोर जास्त राहील. बुधवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला.

मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यातही बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता अधिक आहे. बुधवारनंतर पावसाची जोर कमी होण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भातही दणका देणार

विदर्भातील जिल्ह्यामध्येही पुढील ५ दिवस पाऊस काही ठिकाणी दणका देण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT