Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सून २ दिवसात कर्नाटकात येणार; माॅन्सून कुठपर्यंत पोचला? माॅन्सूनची काही भागात आजही प्रगती

Weather Update : राज्यात पुढील २ दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील २ ते ३ दिवसांमध्ये आणखी काही भागात माॅन्सून प्रगती करेल. तसेच  राज्यात पुढील २ दिवस काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आजही काही भागात प्रगती केली आहे. बंगालचा उपससागरात आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला. तर त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा संपूर्ण भाग माॅन्सूनने आज व्यापला. तसेच हिमालयाकडील पश्चिम बंगालचा आणि सिक्कीमचा बहुतांशी भागही माॅन्सूनने व्यापला. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे.

त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच संपूर्ण केरळ आणि लक्षद्वीप, कर्नाटकचा काही भाग, तमिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होईल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. आज वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकणातील रत्नागिरी पालघर, ठाणे, रायगड आणि मंबई तसेच पुढील २ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. 

शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला. सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. सोमवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, तसेच कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. मगळवारीही या भागात वादळी पावासाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Mahavitaran : सिद्ध पिंपरीत महावितरण विरोधात धडक मोर्चा

Ujani Bridge: उजनीत साकारतोय विकासाचा सेतू!

Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Fake Seed Complaints: नागपूर विभागात बोगस बियाण्यांच्या ३९४ तक्रारी

Yavatmal Farmers: यवतमाळमध्ये प्रीमियम वाढीने पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

SCROLL FOR NEXT