Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सून `जैसे थे` च; विदर्भात पावसाचा अंदाज; कोकण, विदर्भ वगळता पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने पुढील ४ दिवस कोकण आणि विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला.

Anil Jadhao 

Pune News : जवळपास आठवडाभर माॅन्सूनचा प्रवास थांबलेला आहे. आजही माॅन्सून एकाच जागेवर होता. राज्यातही पावसाचा जोर कमी झालेला आहे. तर हवामान विभागाने पुढील ४ दिवस कोकण आणि विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला. 

माॅन्सूननचा रखडेला प्रवास आजही कायम होता. माॅन्सून जवळपास आठडाभर एकाच जागेवर ठाण मांडून आहे. माॅन्सूनची राज्यातील सिमा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, माॅन्सूनने बुधवारनंतर राज्यात मुक्काम केला आहे. माॅन्सूनची राज्यातील सिमा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. 

विदर्भातील पूर्व भाग आणि खानदेशातील नंदूरबार जिल्हा व्यापायचा बाकी आहे. तेलंगणाचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात माॅन्सून पोचलेला आहे. माॅन्सूनची सिमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. उद्यापासून शनिवारपर्यंत कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT