Weather Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सून उद्यापर्यंत केरळात येणार; माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान; राज्यात पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सून उद्यापर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सूनची वाटचाल सुरुच आहे. तर राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज प्रगती केली नाही. पण पुढील २४ तासांमध्ये माॅन्सून प्रगती करण्यासाठी पोषक हवामान आहे आणि माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. उद्यापर्यंत माॅन्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा उर्वरित भाग, लक्षद्वीप आणि केरळ तसेच ईशान्यकेडील राज्यांचा काही भाग आणि अरबी समुद्रात माॅन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील काही भागात शुक्रवारपासून पुन्हा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. तर काही भागात उष्णता कायम राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर बीड, जालना आणि परभणीत हलक्या पावसाचा अंदाज दिला.

तर उद्यापासून पुढील ३ दिवस कोकणातील रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण तसेच मराठवड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर शनिवारी कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापू, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि बीड तसेच विदर्भातील नागपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. रविवारी राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT