Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025 Forecast: माॅन्सूनचा मुक्काम; राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज

Heavy Rain Warning Maharashtra: माॅन्सूनने अंदमानमध्ये मुक्काम घेतला असून, राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने अंदमानला धडक दिल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला. पोषक हवामान असल्याने माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांत आणखी काही भागात वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 

माॅन्सूनने मंगळवारी दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेटांचा काही भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात प्रगती केली होती. मात्र आज माॅन्सूनचा मुक्काम त्याच भागात होता. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्राचा उरलेला भाग आणि मध्य बंगालाच्या उपसागराच्या काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील काही भागात मागील ४ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडली आहेत. तसेच काही ठिकाणी पिकांनाही फटका बसत आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाला पोषक हवामान आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पाऊस दणका देण्याची शक्यता आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT