Pune News : माॅन्सूनची वाटचाल कालपासून मंदावली आहे. बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे प्रवाह अद्यापही क्षीण आहेत. यातच अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थबकली आहे. तरीही पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून देशाच्या आणखी काही भागात दाखल होऊ शकतो, असा अंदाज आहे.
तसेच पुढील ४ दिवसांमध्ये राज्यात बहुतांशी ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सूनने बुधवारी राज्यातील काही भागात प्रगती केली होती. पण काल आणि आज माॅन्सूनचा मुक्काम एकाच जागेवर आहे. राज्यात माॅन्सून जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे.
माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. विदर्भ आणि खानदेशचा काही भाग माॅन्सूनने व्यापायचा बाकी आहे. तेलंगणाचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात माॅन्सून पोचलेला आहे. माॅन्सूनची सिमा आजही नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, बिजापूर, सुकमा, मलकानगरी आणि विजयानगरम या भागात होती.
माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने राज्यातील बहतांशी भागात पुढील ४ दिवसांमध्ये वादळी पावसाचा अंदाज दिला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.